file photo 
नागपूर

शाळा बंद, अभ्यास सुरू! सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना टेन्शन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सुट्यांमध्ये दरवर्षी शालेय शिक्षण विभागाकडून कुठलाही शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत नाही. यावर्षी कोरोनाची परिस्थिती ओढावल्याने डायटसह विभाग आणि जिल्हास्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने आता सुट्यांमध्येही विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येताना दिसत आहे. 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेद्वारा निर्मित गेल्या 26 दिवसांपासून 'शाळा बंद पण अभ्यास सुरू' अशी अभ्यासमाला व्हॉट्‌सऍपवर पाठविण्यात येत आहे. ही अभ्यासमाला डायट, जिल्हा परिषद, समूह साधन केंद्र, गटसाधन केंद्र या क्रमाने शाळेचे मुख्याध्यापक ते शिक्षकांपर्यंत व्हॉट्‌सऍपद्वारे पोहोचत आहे. 

याशिवाय विभागीय आयुक्त स्तरावरूनसुद्धा प्रथम संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम तयार करून मोबाईल रेडिओ लिंकवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना शिक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचा आभास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात शिक्षकांकडून सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात विविध अडचणी असल्याने शिक्षण विभागाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांमध्ये गरीब, मध्यमवर्गीय कामगार मजुरांची मुले शिकतात. लॉकडाउनमध्ये दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होत नसताना मोबाईल रिचार्ज, इंटरनेट यावर होणारा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न पालक करीत आहेत. सुरुवातीच्या काळात ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्याकडून शिक्षकांचे कॉल उचलले जात नसल्याचे दिसून येते. कुठे नेटवर्किंग नसल्याने फोन लागत नाही. काही पालकांच्या मोबाईलवर पीडीएफ किंवा लिंक उघडत नाही. अशा नानाविध समस्या येत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व तांत्रिक समस्येवर शिक्षण विभागाकडे काही उपाय नसल्याचे दिसते. 

आढावा घ्यायचा कसा? 
शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या कार्यक्रमात फक्त 25 टक्के शहरी पालकांच्या मोबाईलपर्यंत पोहोचला तरी पालक आपल्या पाल्यांचा अभ्यास करून घेतात की नाही, याबाबत आढावा कसा घ्यावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशिक्षण परिषद फक्त अँड्रॉइड मोबाईल, साधे मोबाईल व दोन्ही मोबाईल नसलेल्या पालकांची आकडेवारी गोळा करून विश्‍लेषण करण्याचे काम करीत असून त्यासाठी केंद्रप्रमुखांकडून लिंकवर माहिती मागवीत आहे. 

अनेक पर्याय 
लॉकडाउन पुढे किती काळ राहील हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे शाळा बंदच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शिक्षण विभागाने झूम ऍप, ऑनलाइन अभ्यास, मोबाईल रेडिओ, दीक्षा ऍप असे पर्याय समोर आणले आहेत. 


मागील सत्रातील पंधरा दिवसांत बुडालेल्या अभ्यासासाठी उन्हाळी सुटीत बालकांना अभ्यासाच्या नावाने वेठीस धरू नये व परीक्षाच नाही तर अभ्यास कशासाठी, असा प्रश्नही पालक करू लागले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत अभ्यासमाला स्थगित करावी. 
-शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT